फैजपुरात सीएम चषकला स्पर्धकांच्या उत्स्फुर्त प्रतिसाद

0

आमदार हरिभाऊ जावळे यांच्याहस्ते उद्घाटन; 35 स्पर्धांकांचा सहभाग
फैजपूर – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सीएम चषकला आज फैजपूर येथे सुरुवात करण्यात आले. फैजपूर यावल रस्त्यालगत असलेल्या सुमंगल हॉलमध्ये सकाळी 11 वाजता आमदार हरिभाऊ जावळे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबाले, डिवायएसपी राजेंद्र रायसिंग, पं.स.कककककसभापती पल्लवी चौधरी, फैजपूर नगराध्यक्ष महानंदा होले, दूध संघाचे संचालक हेमराज चौधरी, प्रदेश सदस्य बी.के.चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, जि.प.सदस्य सविता भालेराव, नंदा सपकाळे, संगांयो अध्यक्ष विलास चौधरी, रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष पिंटू राणे, नितीन राणे, राकेश फेगडे यासह मान्यवर उपस्थित होते.

इतकी मोठी स्पर्धा प्रथमच- आमदार जावळे
आमदार हरिभाऊ जावळे यांनी सांगितले की, कधी नव्हे इतकी मोठी स्पर्धा या राज्यात प्रथमच आयोजन करण्यात आले जेणेकरून ग्रामीण भागातील मुला मुलिंना त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा हि संकल्पना मनाशी ठेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सीएम चषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतून जो विजेता होईल त्या स्पर्धकाला मुंबई येथे स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेत एकूण 35 स्पर्धकांचा सहभाग होता. यात समूह नृत्य 17. आणि एकाकी नृत्य 18 स्पर्धकांचा सहभाग होता.

Copy