फैजपुरातील कोरोनाबाधीतांची संख्या पोहोचली दहावर

0

फैजपूर : शहरातील कोरोनाबाधीतांच्या संख्येत पुन्हा एकने वाढ झाली आहे. आता कोरोना बाधितांची संख्या ही दहावर जाऊन पोहोचली आहे. इस्लामपुरा इदगाह रोडवरील पाच दिवसांपूर्वी मयत झालेल्या एका इसमाचा अहवाल सोमवारी रात्री प्राप्त झाला असून हा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. मयत इसमाच्या घरातील काही सदस्यांना कॉरंटाईन करण्यात आले असून तो
परीसर सील करण्याची कारवाई सुरू झाल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली. दरम्यान, सोमवारीच खुशालभाऊ रोडवरील एका व्यावसायीकाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने तो परीसर सील करण्यात आला होता. त्यामुळे आता शहरातील कंटेनमेंट झोनची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे.

Copy