फुटबॉल महासंघाचे सल्लागारपद गतवर्षीच सोडले

0

कोलकाता । अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) सल्लागारपदावरुन हाकलण्यात आल्याचे वृत्त खोडसाळपणाचे आहे. या पदाची सर्वसाधारणपणे सल्लागारपदाची मुदत वाषिॅक सभेपर्यंतच असते. त्यानुसार माझी मुदत गतवर्षीच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी संपली होती.नवीन सल्लागार नियुक्त करण्यासाठी एआयएफएफची नवीन समिती निर्णय घेणार आहे, असे असे आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू बायच्युंग भूतिया याने येथे सांगितले.

एआयएफएफबरोबर मतभेद
भारताच्या सतरा वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदी भूतिया याने केलेल्या शिफारशीऐवजी पोर्तुगीजचे लुईस नोर्टन डीमाटोस यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीवरुन भूतिया याचे एआयएफएफबरोबर मतभेद निर्माण झाले व त्यामुळेच भूतिया याला सल्लागारपदावरुन दूर करण्यात आले, असे वृत्त प्रसिध्द झाले होते. या वृत्ताचा इन्कार करीत भूतिया म्हणाला,की मला बदनाम करण्यासाठीच असे वृत्त पसरविले जात आहे. एआयएफएफच्या कोणत्याही पदाधिकार्‍यांबरोबर माझे मतभेद नाहीत.

एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी ऑक्टोबर 2015 मध्ये भूतिया याला सल्लागारपदी नियुक्त केले होते. यंदा सतरा वर्षांखालील गटाची विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे. त्यादृष्टीनेच भूतियाकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. भारताच्या वरिष्ठ संघाचे प्रशिक्षकपदी स्टीफन कॉन्सस्टाईन यांच्याकडे पुन्हा जबाबदारी सोपविण्यासाठी भूतिया याने खूप प्रयत्न केले होते. कॉन्स्टंटाईन यांनी भारतीय फुटबॉल क्षेत्रात गती आणली होती. त्यामुळेच त्यांच्याकडे पुन्हा प्रशिक्षकपद देण्यासाठी भूतिया आग्रही होता. एआयएफएफनेही भूतिया याची ही सूचना मान्य करीत कॉन्स्टंटाईन यांच्याकडे फेब्रुवारी 2018 पर्यंत वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविली.