फुकट्या 195 रेल्वे प्रवाशांकडून सव्वा लाखांचा दंड वसुल

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे स्थानकावर शनिवार, 27 रोजी फुकट्या रेल्वे प्रवाशांविरुद्ध धडक तपासणी मोहिम राबवण्यात आली. 195 प्रवाशांकडून तब्बल एक लाख 26 हजार 220 रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याने फुकट्या रेल्वे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. वरीष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडल वाणिज्य प्रबंधक सहाय्यक वाणिज्य प्रबंधक (टीजा) बी.अरुण कुमार , मंडल मुख्य तिकीट निरीक्षक आहुलवलीया आणि विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय.डी.पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या मोहिम 16 तिकीट तपासणी कर्मचारी सहभागी झाले. रेल्वे प्रवाशांनी नियमानुसार तिकीट काढून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.