फिट इंडिया वर्धापनदिन: ‘फिटनेस की डोस आधा घंटा रोज’ मोदींचा कानमंत्र

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारने फिट इंडिया मोहीम चालविली आहे. वर्षभरापूर्वी या मोहिमेला सुरुवात झाली. देशातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी याबाबत आवाहन मोदींनी केले होते. देशातील सेलिब्रिटी विविध क्षेत्रात विशेष नाव असलेल्यांनी आरोग्याविषयी देशवासियांना संदेश दिला. दरम्यान आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘फिट इंडिया’ मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला, तसेच ते त्यांच्या आरोग्याविषयी काय विशेष काळजी घेतात? याबाबत देशातील जनतेला संदेश देण्याचे आवाहन केले. भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहली, अभिनेता मिलिंद सोमण, फुटबॉलपटू अफसान आशीफ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मोदींनी संवाद साधला. प्रत्येकाने दररोज स्वत:च्या शरीरासाठी अर्धातास द्यावा असे आवाहन मोदींनी केले. यासाठी त्यांनी’फिटनेस की डोस आधा घंटा रोज’ असा कानमंत्र दिला.

देशातील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची प्रार्थना करतो असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.