फिजिओलॉजिस्ट प्राध्यापकाचा सिव्हिलमध्ये धिंगाणा ; डीनच्या खुर्चीवर केला कब्जा

0

जळगाव : शासकीय महाविद्यालयाचे फिजिअोलॉजिस्ट व प्राध्यापक डॉ.डांगे यांनी चक्क टी शर्ट बरमुडा पॅन्ट परिधान करून सोमवारी डीन यांच्या खुर्चीचा कब्जा घेतला. एवढेच नाहीतर मद्यधुंदवस्थेत गोंधळ घालत मीच महाविद्यालयाचा डीन आहे असे म्हणत कर्मचाऱ्यांना अरेरावी तसेच शिवीगाळही केल्याची माहिती मिळाली आहे. डीन यांच्या खुर्चीवर बसलेल्या या प्राध्यापकाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून एकच खळबळ उडाली आहे. तसेच संबंधित फिजिलॉजिस्ट प्राध्यापकांवर कारवाईची देखील मागणी होत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासुन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या बदलीची चर्चा आहे. मात्र त्याबाबत कुठलेही आदेश खैरे यांना अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. तर दुसरीकडे अधिष्ठाता म्हणून कोल्हापूर येथील डॉ. मीनाक्षी गजभिये यांची जळगावात बदली झाली आहे. खैरे व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यात समन्वय नसणे तसेच कोरोनाबाधितांची संख्या वाढणे मृतांचा आकडा वाढणे यामुळे जळगावचे कोव्हीड रुग्णालय राज्यभरात चर्चेत आले आहे . तर दुसरीकडे सोमवारी फिजिअोलॉजिस्टने मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्याच्या प्रकाराने पुन्हा शासकीय महाविद्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

काय घडला प्रकार

शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा पदभार सद्यस्थितीत डॉ. पोटे यांच्याकडे आहे. अधिष्ठातांच्या खुर्चीचा मान ठेवून ते त्या खुर्चीच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या खुर्चीवर बसलेले होते. यादरम्यान सोमवारी अचानक कार्यालयात टी शर्ट आणि बर्मुडा पॅन्ट परिधान केलेले मद्यधुंद अवस्थेतील फिजिओलॉजिस्ट प्राध्यापक डॉ. डांगे महाशय आले. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ते थेट अधिष्ठातांच्या खुर्चीवर जाऊन बसले. डॉक्टर पोटे यांनी त्यांना याबाबत विचारले असता मीच अधिष्ठाता आहे अशा अविर्भावात डॉ. डांगे बोलले. एवढ्यावरच प्राध्यापक थांबले नाहीत तर त्यांनी कर्मचाऱयांनाही शिविगाळ तसेच अरेरावी केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. कार्यालयात बसलेल्या एकाने फिजिऑलॉ जिस्ट अधिष्ठातांच्या खुर्चीवर बसले असल्याचा मोबाईलमध्ये व्हिडियो केला. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर या फिजिऑलॉजिस्टचा गोंधळ घातलेला प्रकार समोर आला. प्रकाराची कोव्हिड रुग्णालयासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्‍यांमध्ये दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान काहि दिवसांपुर्वी स ड्रंक अन ड्राइव्हच्या कारवाईमध्ये डॉक्टर डांगे यांचे वाहन पोलिसात जमा असल्याचेही समजते. याबाबत शासकीय महाविद्यालयातील वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

पहा व्हिडीओ