फाशीची शिक्षा रद्द करावी; निर्भायातील आरोपीची सुप्रीम कोर्टात याचिका

0

नवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक दोषी विनय कुमार याने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. शिक्षा रद्द करावी, अशी मागणी विनय शर्मा याने केली आहे. ७ जानेवारीला दिल्ली हायकोर्टाला या प्रकरणातील चार दोषींविरोधात फाशीची शिक्षा सुनावली. या चार दोषींना २२ जानेवारी या दिवशी फाशी देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व ४ दोषींना २२ जानेवारी या दिवशी सकाळी ७ वाजता एकत्रितपणे तिहार तुरुंगात तुरुंग क्रमांक ३ मध्ये फाशी देण्यात येणार आहे. यासाठी यूपीतील कारागृह विभागाने तिहारमध्ये फाशी देणाऱ्या व्यक्ती पाठवण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले आहे. तिहार तुरुंग प्रशासनाने उत्तर प्रदेशातील फाशी देणाऱ्या जल्लादांना बोलावले आहे. कानपूर येथे राहणारे जल्लाद आता वयस्क झाले आहेत. या मुळे निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणीतील दोषींना मेरठ येथे राहणारे जल्लाद फाशी देईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक दोषी अक्षय ठाकूर याने केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या अक्षय ठाकूर याच्या वकिलाला पूर्ण संधी देण्यात आली. मात्र, दोषीच्या वकिलाने काहीही म्हणणे मांडले नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

Copy