फार्मासिस्ट” एक बहुयामी कोरोना योध्दा

4

फार्मासिस्ट हा समाजाचा आरोग्य सेवेचा एक महत्वाचा घटक आहे. तो या कोरोना साथीच्याच नव्हे तर आजपर्यंत आलेल्या सर्व आजार असतील, साथीचे आजार सर्वांमध्ये एक प्रमुख सेवा देणारा, औषध निर्मितीपासून तर औषध रुग्णांना देण्यापासून रुग्णांना औषधीपर समुपदेशन करणारा एक आरोग्य सेवेचा अविभाज्य घटक होय. एक विचार करा डॉक्टर आहेत, रुग्णालयात रुग्ण सेवा देणारे परिचारिका, सपायी मंडळी आहेत. पण लागणारे औषध उपलब्ध नाही काय होईल. आपण असा विचारही करू शकत नाही. कारण या औषध शिवाय रुग्णांवर उपचार कसा करावा हा प्रश्न प्रत्येक डॉक्टरला सतावत राहील. ज्याप्रमाणे प्राणवायू जगण्याकरिता आवश्यक आहे. तसेच आज औषधवर सर्व जीवन येऊन ठेपले आहे.

आज कोरोना महामारीत एक लस अजून नाही. औषध नाही सर्व जग भयभीत झाले. मृत्यू श्रुखला सुरू आहे. आज इतके दगावले रोज मृतांचे आकडे ऐकवत येतात. आपण समजू शकतो का एक फार्मासिस्ट औषध निर्मितीसाठी किती प्रयत्नशील असतो. औषध संशोधन तर औषध रुग्णांना मिळते तोपर्यंत सर्व औषध फार्मसिस्ट हा प्रत्येक औषध घटकाला एका कुंभाराप्रमाणे आकार देत औषधी निर्मिती करतो. जेणेकरून रुग्ण बरा व्हावा. फार्मासिस्ट आज तितक्याच तत्परतेने आपली सेवा देत आहे. एक आजराच्या शोधपासून त्याच्यावर उपचारासाठी औषध शोधण्याचे कार्य फार्मासिस्ट करत असतो. याला फार्मसी क्षेत्रात “फार्मकॉलॉजिस्ट” असे म्हणतात. या उपचारसाठी औषध बनविण्यासाठी शोध म्हणजे फार्मास्युटिकल केमिस्ट्री यात वनस्पतीतुन ऍक्टिव्ह घटक, काही केमिस्ट्रीचे सिद्धांत वापरून औषध संशोधन करत असतो. याला “ड्रग डीस्कॉवेरी अँड डेव्हलपमेंट” असे म्हणतात. या संशोधनप्रसंगी हजारो नवीन औषध विविध माध्यमातून बनविले जातात. पण त्यांच्या टेस्टिंगवेळी यापैकी एकही औषध योग्य नसलं तर फार्मासिस्टने केलेली सर्व मेहनत निष्फळ होते, ही बाब अतिशय खर्चिक आहे. यात फार्मासिस्टचा संयम ही तुटत चालतो. बराचवेळा विषाणू, बॅक्टरीया, जंतू त्यांच्यात वेळोवेळी बदल घडवत राहतात. त्याला “मुटेशन” असे म्हणतात. ही वेळ आता या कोरोना विषाणूने आणून ठेवली आहे.फार्मासिस्टसाठी अशी वेळ फार अवघड आणि जिकरीची असते.

औषध कसे शोधायचं फार मोठा प्रश्न उभा राहतो. जसा आज सर्व जगासमोर कोरोना लस किंवा औषध शोधण्यात अडथळे जंतू निर्माण करत आहे.औषधाचा योग्य शोध झाल्यानंतर ते किती प्रमाणात घेणे आवश्यक आहे. म्हणजे औषधाचा डोस हे फार्मसुटीकस या विषयात प्राविण्य असलेले फार्मासिस्ट करतात. औषध तयार आहे त्याचा गुणधर्म कसा आहे. त्याचे सर्व घटक योग्य आहे की नाही हे फार्मसुटीकल अनलयसिस हे फार्मासिस्ट करतात. हे औषधची योग्यता, प्युरीती शुद्धता सिद्ध करतात. फार्मासिस्ट ह्या सर्व औषध तयार झाल्यानंतर बाजारात येण्या अगोदर औषध प्राण्यांवर प्रयोग करत एक उत्तम गुणाचे औषध शोधण्याचे कार्य एक फार्मासिस्ट करत असतो. या प्राण्यांवर औषध प्रयोगाला प्रिक्लिनिकेल ट्रायल असे संभवतात.

सर्व टेस्टिंगनंतर औषध पास झाल्यावर निरोगी मानव व रुग्णावर या औषध टेस्ट केले जातात. याला “क्लिनिकल ट्रायल” म्हणतात. ही टेस्ट औषध पास करतो, मग त्याला अन्न व औषधकडून मान्यता मिळवावी लागते. त्यानंतर हे औषध बाजारात येत ही सर्व कसरत एक फार्मासिस्ट करत असतो. या सर्व आजारांवर हा फर्नासिस्ट एका योध्याप्रमाणे औषध संशोधन आणि जंतू यांच्याबरोबर युद्ध करत तो जिंकतो. एक या जंतू प्रादूर्भाव विरुद्ध एक औषधरुपी ब्राह्मअस्त्र निर्माण करतो. सर्व जगताचे मानवाचे प्राण वाचविण्यासाठी झटत असतो, असा योद्धा जो कायम एक दुर्लक्षित घटक आहे, याची खंत वाटते.
सध्य कोरोना परिस्थितीत देखील फार्मासिस्ट अभुतपुर्व सेवा देत सर्वाना दिसत आहे. त्याची फार्मसी हॉटस्पॉट असो का ग्रीन झोन तो रुग्ण औषधरुपी सेवा देण्याच्याकरिता कटिबद्ध आहे उभा आहे. तो सर्व लोकांना या विषाणूबद्दल याच्या दुष्परिणाम काय आपण काळजी कशी घ्यावी हे तो समुपदेशनने करत आहे. मला गर्व आहे की मी एक फार्मासिस्ट आहे आणि माझ्या या लेखद्वारे मी सर्व फार्मासिस्ट योध्याचे अभिनंदन आणि आभार मानतो.
◆ *प्रा.डॉ.भूषणकुमार साठे
चिंचोली प्राचार्य, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, वर्धा. मो.९४२०११२१५५

Copy