फानलमध्ये सिंधूचा मुकाबला मरीनशी होणार

0

नवी दिल्ली । भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू इंडिया ओपन सुपर सीरिजच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. आता फायनलमध्ये तिचा मुकाबला कॅरोलिना मरीनशी होणार आहे. सेमी- फायनलमध्ये सिंधूने द.कोरियाच्या सुंग जी ह्यून हिचा 21-18, 14-21, 21-14 असा पराभव केला.सिंधूचा सामना कॅरोलिना मरीनशी होणार आहे.यापुर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये सिधूला हिच्याबरोबर खेळतांना पराभव पत्कारावा लागला होता.

द्वितीय मानांकित सुंग जी ह्यूनचा पराभव
इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिटन स्पर्धेमध्ये तिसरे मानांकन मिळालेल्या सिंधूने दुसर्‍या मानांकित सुंग जी ह्यूनचा उपांत्य फेरीत पराभव करण्याची किमया केली. अंतिम फेरीत तिची गाठ स्पेनच्या अग्रमानांकित कॅरोलिना मरीनशी होणार आहे. रिओ ऑलिंपिकच्या फायनलमध्ये याच कॅरोलिना मरीनशी पी. व्ही सिंधूची गाठ पडली होती. मरीनने या सामन्यात सिंधूला हरवत तिला सिल्व्हर मेडलवर समाधान मानायला लावले होते. यावेळी सिंधूचे पारडे जड मानले जात आहे. आपला खेळही पी व्ही सिंधूने कमालीचा उंचावला आहे. याच स्पर्धेत तिने भारताची फुलराणी सायना नेहवाल हिला पराभवाची चव चाखायला लावली होती. रिओ ऑलिंपिकमध्येही कॅरोलिना मरीनविरूध्द पहिला गेम खिशात टाकत सिंधूने दमदार सुरूवात केली होती. पण नंतरचे दोन गेम्स जिंकत मरीनने सामन्याचे चित्र पालटवले होते. यावेली मात्र सिंधू तिला कडवी लढत देणार अशीच चिन्हे आहेत.

सायन नेहवालनंतर कोण या प्रश्नाचे दमदारपणे उत्तर देत आंतरराष्ट्रीय बँडमिंटनमध्ये भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व करणारी पी व्ही सिंधू नेत्रदीपक प्रगती करत पुढे आली आहे. आता उद्या कॅरोलिना मरीनला हरवत ऑलिंपिकमधल्या पराभवाचा वचपा सिंधू काढणार का याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.