फराळ वाटप

0

भुसावळ । गांधी नगर परिसरात असलेल्या महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनाला येणार्‍या भाविकांना माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, संजय आवटे यांच्या हस्ते प्रसाद वाटप करण्यात आले. तर यशस्वीतेसाठी शम्भूराजे गृपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

तापीतिरी सोमेश्‍वरांला महाभिषेक
मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र मेहूण येथे सुरू असलेल्या महाशिवरात्री महोत्सवांतर्गत शुक्रवार 24 रोजी पहाटे महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्रीसोमेश्‍वर महादेवाच्या पिंडीचा महाभिषेक करण्यात आला. तापीचिये तिरी महत् ग्राम थोर, असे सोमेश्‍वर पुरातन या संत नामदेव महाराज यांच्या अभंगानुसार सोमेश्‍वर महादेवाचे जागृत स्थान गेल्या अनेक शतकांपासून तापीतीरी महत् नगर येथे आहे. त्यामुळे बाराव्या शतकात संत मुक्ताई गुप्त झाल्यानंतर सर्व संतमंडळींनी तापीची पूजा करून सोमेश्‍वराची देखील पूजा केली. पूजियेली तापी पूजिला सोमेश्‍वर असे वर्णन संत नामदेव महाराज यांनी समाधी प्रकरणातील अभंगांमध्ये केले आहे. त्यानुसार माघ महाशिवरात्रीचे औचित्य साधून शुक्रवार 24 रोजी पहाटे श्रीसोमेश्‍वर महादेवाचा महाभिषेक व महाआरती करण्यात आली. भुसावळ येथील ज्ञानेश्वर घुले व सुनंदा घुले आणि सुनिल वानखेडे व नलिनी वानखेडे या दोन दांम्पत्यांच्या हस्ते पंचामृताचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर संत आदिशक्ती मुक्ताई यांची आरती देखील करण्यात आली. यावेळी पुजारी हभप भानुदास महाराज मेहूणकर व हभप ज्ञानेश्वर महाराज मेहूणकर, डॉ. जगदीश पाटील, हर्षल पाटील यांच्यासह भाविकांची उपस्थिती होती. शनिवार 25 रोजी काल्याच्या कीर्तनाने महाशिवरात्री महोत्सवाचा समारोप होणार आहे.