VIDEO: फडणवीस चांगले सूचनाकार त्यांनी सूचनाच कराव्या: गुलाबराव पाटील

0

जळगाव: राज्याचे माजी मुख्यमंत्री विरोधीपक्षनेते सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करतात. वाढीव वीजबिलासह अनेक मुद्द्यांवरून फडणवीसांनी सरकारला निशाणा केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार सावकारी वृत्तीचे असल्याची टीका फडणवीस यांनी केली होती. यावर  राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, सरकारवर टीका करणे सरकारला सूचना करणे हे त्यांचे कामच आहे, फडणवीस हे चांगले सूचनाकार असून त्यांनी कायम सरकारला सूचनाच कराव्या अशी बोचरी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. जिल्हा परिषदेत जागतिक शौचालय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत दिव्यांगांसाठी शौचालय बांधकामाचे शुभारंभ करण्यात आला. यावेळी जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, समाजकल्याण सभापती जयपाल बोदडे, सीईओ डॉ.बी.एन.पाटील, अतिरिक्त सीईओ गणेश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, जि.प.सदस्य अमित देशमुख, नानाभाऊ महाजन आदी उपस्थित होते.

Copy