फडणवीसांमुळेच मला क्लीनचीट नाही: खडसेंचा थेट आरोप

0

जळगाव: माजी मंत्री एकनाथराव खडसे हे नाराज असल्याची चर्चा आहे. ते सातत्याने भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करत असतात, मला संपविण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचे ते अनेकदा बोलले आहे. दरम्यान आज गुरुवारी १० रोजी त्यांनी पुन्हा फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले, मात्र त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीनचीट दिली. परंतु मला फडणवीस यांनी क्लीनचीट दिली नाही असा थेट आरोप खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांच्यावरील “जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज गुरुवारी खडसेंच्या फार्महाऊसवर ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागळे यांनी पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर हल्लबोल केला आहे.

आमचे मुख्यमंत्री आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. कोणावरही आरोप झाले की लगेच क्लिनचिट मिळायची. मात्र खडसे यांना निर्दोष असतांना क्लिनचिट मिळाली नाही, असा टोलाही एकनाथ खडसे यांनी लगावला.

भाजपामध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा पक्षावर जोरदार टीका केली आहे. हा नाथाभाऊ अन्याय सहन करणारा नाही, स्वस्थ बसणारा नाही. पक्षच्या नेत्यांकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत भांडणार, असे सांगत एकनाथ खडसे यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. तसेच मी पक्षाविरोधात बोललेलो नाही. मला देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून त्रास झाला हे मी नाव घेऊन सांगतो, असा थेट आरोपही खडसे यांनी केला.

Copy