Private Advt

प. वि. पाटील विद्यालयात सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जळगाव – केसीई सोसायटी संचलित प वि पाटील विद्या मंदिर येथे सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी गुगल मीट व युट्युब लाईव्ह च्या माध्यमातून योग दिन साजरा केला.
      शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे आपल्या जीवनातील महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवले व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सोबत सदर प्रात्यक्षिके केली त्यात वृक्षासन ,ताडासन, त्रिकोणासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, मकर रास, सेतुबंधासन, पवनमुकरासन, शवासन, कपालभाती, प्राणायाम, ध्यान इत्यादी योगासने व प्राणायाम विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी केले.
       सदर कार्यक्रमास उपशिक्षक योगेश भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले तर उपशिक्षक निवृत्ती चौधरी, सरला पाटील, दिपाली चौधरी, कल्पना तायडे, स्वाती पाटील, सूर्यकांत पाटील , देवेंद्र चौधरी ,सुनील नारखेडे, सुधीर वाणी आधी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.