प्लॉट विक्रीच्या वादातून महिला सरपंचासह दोघांना मारहाण

0

धुळे । प्लॉट विक्रीच्या वादातून महिला सरपंचसह दोघांना मारहाण करणार्‍या सात जणांविरूद्ध तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सचिलाल ओंकार मोरे (55, रा. काळखे ह.मु.पुणे) यांनी दिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दीड वर्षापुर्वी सचिलाल मोरे यांनी शांताराम सिताराम मोरे यांच्याकडून प्लॉट विकत घेतला होता.

मात्र आता शांताराम मोरेने विकलेला प्लॉट देण्यास नकार दिला. त्यामुळे सचिलाल मोरे यांनी माझे पैसे द्या, असे सांगिल्याचा राग येवून शांताराम मोरे त्याची पत्नी उषाबाई मोरे, प्रविण मोरे, गौतम मोरे, सरूबाई मोरे, हिरूबाई मोरे, तस्मीबाई मोरे यांनी मारहाण केली. तसेच या प्रकरणात मध्यस्ती करणार्‍या सरपंच सुरेखा संतोष मोरे आणि अन्य एक जणाल बेदम मारहाण केला. दिलेल्या फिर्यादीनुसार वरिल सात जणांविरूद्ध तालुका पोलिसात भादंवि कलम 142, 147, 149, 324, 323, 524, 506 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास हे कॉ चौधरी हे करीत आहेत.