प्लेबॉय… पुन्हा मागच्याच वळणावर

0

न्यूयॉर्क । आज आम्ही आमची ओळख पुन्हा एकदा प्रस्थापित करत आहोत, आमच्याच जुन्या मार्गाने, अशा आशयाचा ट्विट करीत प्लेबॉय या जगप्रसिद्ध मासिकाचे नवे क्रिएटिव्ह डायरेक्टर कूपर हेफनर यांनी प्लेबॉय पुन्हा एकदा जुन्या म्हणजेच नग्नतेच्याच मार्गाने प्रसिद्धी मिळवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

गत वर्षी या मासिकाने घेतलेला धोरणात्मक निर्णय मागे घेत या मासिकामध्ये पुन्हा एकदा तेच सारे काही असेल, ज्याची वाचकांना गरज आहे, असेही कूपर यांनी म्हटले आहे. मासिकाच्या या निर्णयाचे सोशल मिडियावर संमिश्र स्वागत झाले आहे. काही जणांनी या निर्णयाची मनमोकळी प्रशंसा केली आहे; या नव्या धोरणाबरोबरच मासिकाच्या पुढच्या महिन्यामधील अंकामध्ये अभिनेत्री स्कार्लेट बायरन हिचा लेखही समाविष्ट केला जाणार आहे. 1953 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या मासिकाचा खप 1970 च्या दशकांत 50 लाखांहूनही अधिक होता. मात्र, इंटरनेटच्या उदयानंतर या मासिकाचा खप घसरण्यास सुरुवात झाली होती.