प्रो-लिग हॉकी राष्ट्रीय महिला स्पर्धेसाठी संघ रवाना

0

जळगाव। गुजरात हॉकी संघटनेच्या माध्यमाने राजकोट येथे 1 ते 7 मे पर्यंत राष्ट्रीय पातळीवरील पुरुष व महिलांच्या प्रो-लिग हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून महिलांच्या चार राज्यातून राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात येथून फक्त 8 संघाना प्रवेश मिळाला असून त्यात जैन स्पोर्टस् अ‍ॅकडमी व डॉ.अण्णासाहेब बेंडाळे महाविद्यालयातील महिलांची निवड करुन तो संघ जैन स्पोर्टस् अ‍ॅकडमीच्या नावाने पाठविण्यात आला. या संघाला निरोप व मार्गदर्शनासाठी जि.प.जळगावच्या समाजकल्याण अधिकारी तथा हॉकीच्या राष्ट्रीय खेळाडू अनिता राठोड यांची उपस्थिती होती. त्यांनी खेळाडूंना खास टिप्स देऊन शुभेच्छा दिल्या.

सर्वप्रथम त्यांचे स्वागत हॉकी जळगावच्या सहसचिव प्रा.डॉ.अनिता कोल्हे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष फारुक शेख यांची उपस्थिती होती. संघाचे प्रशिक्षक म्हणून सैय्यद लियकत अली, कर्णधार नुतन शेवाळे, उपकर्णधार पुजा माहेरकर यांची निवड फारुक शेख यांनी घोषित केली. कर्णधार नुतन शेवाळे, उपकर्णधार पुजा मोहरकर, पुनम पाटील, सायली खडांगळे, दिपीका सोनवणे, माधुरी भारुळे, निशा सपकाळे, प्रिया जाधव, मोहिनी कोळी, मोहिनी माळी, रुपाली मराठे आदी.