Private Advt

प्रेमात पडलेल्या मुलीचा आई-वडीलांनीच केला खून

सातारा : नात्याने चुलता लागलेल्या तरुणाच्या प्रेमात मुलगी पडल्याने उभयंतांनी लग्नाचा निश्‍चय केला मात्र कुटुंबियांना ही बाब मान्य नसल्याने 17 वर्षीय मुलीचा जन्मदात्या आई-वडिलांनीच खून केला. विशेष म्हणजे गळा आवळून खून केल्यानंतर आरोपींनी मुलीचा मृतदेह डोंगरात पुरला. पोलिसांनी पंधरा दिवसांनंतर मृतदेह बाहेर काढला. कर्‍हाडजवळील कुसूर गावाजवळ ही घटना घडली.

सोयरीक पसंत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल
भावकीतीलच युवक जो नात्याने चुलता लागतो, त्याच्या प्रेमात मुलगी पडली पडली होती. दोघांनीही लग्नगाठ बांधण्याचे नक्की केले होते. मात्र, ही सोयरीक पसंद नसल्यानेच आई व वडिलांनी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

प्रेमसंबंधाला कुटुंबियांचा विरोध
एका गावातील 17 वर्षीय मुलीचे गावातीलच युवकाशी प्रेमसंबंध होते. या संबंधाला मुलीच्या आई-वडिलांचा विरोध होता. त्यातच अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर, त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांना समजले होते त्यामुळे ते मुलीवर चिडून होते. त्यांनी मुलीला संपविण्याचा निर्णय घेतला. 17 एप्रिल रोजी समजूत घालण्याच्या बहाण्याने त्यांनी तिला जवळच असलेल्या मामाच्या गावाकडे नेले. त्या ठिकाणी निची समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तरीही मुलगी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आई-वडील मुलीला घेऊन डोंगर परिसरात गेले. त्याठिकाणी त्यांनी दोरीने गळा आवळून मुलीचा खून करून मृतदेह डोंगरामध्ये काढलेल्या खड्यात पुरला.

खून करीत पोलिसात नोंदवली तक्रार
दुसर्‍या दिवशी मुलगी कोणाबरोबर तरी पळून गेल्याचे सांगत त्यांनी कहाड ग्रामीण पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. गत पंधरा दिवसांपासून पोलिस शोध घेत होते. गावात केलेल्या चौकशीवरून संशय बळावला त्यामुळे मुलीच्या आई-वडिलांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. न्यायालयाने आई-वडिलांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

चार दिवस बाप खोदत होता खड्डा
पोटच्या मुलीचा खून करण्यापूर्वी सलग चार दिवस बाप डोंगरात एकटाच खड्डा खोदत होता. त्यानंतर समजूत घोलण्याच्या बहाण्याने बापासह आईने मुलीला त्या खड्याजवळ नेले. बापाने गळा आवळला. तर आईने तडफडणाया मुलीचे पाय आवळले. त्यानंतर मृतदेह खड्डयात पुरून हे दोघेही निर्विकार चेहयाने घरी निघून गेले.