प्रेमसंबंधातुन तांबापुरातील तरुणाचा खुन

0

जळगाव – प्रेमसंबंधातुन शहरातील तांबापुरा भागातील गवळीवाडा येथील अंकुश उर्फ बबलु हटकर (वय ३५ ) या तरुणाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना बुधवारी रात्री मेहरुण परिसरातील स्मशानभूमी जवळ घडली. गुन्ह्याचे कारण निष्पन्न करुन गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासात एमआयडीसी पोलिसांनी संशयित सुभाष निंबा मिस्तरी रा.रेणुका नगर, मेहरुण यास अटक केली आहे.

शेजारच्यानेच घेतला प्रेमसंबंधातुन अंकुशचा जीव

तांबापुरा परिसरातील रामबाबा कुटीया येथे अंकुश हा आई पत्नी तसेच मुलांसह वास्तव्यास होता. खाजगी वाहनावर तो वाहनचालक म्हणुन काम करायचा. ज्या मालकाकडे काम करायचा त्याच ठिकाणी धुणे भांडे करणार्‍या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. याच महिलेसोबत
अंकुशच्या शेजारीच सुभाष मिस्तरी राहतो. त्याचेही प्रेमसंबंध होते. यातुनच बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मेहरुण परिसरातील स्मशानभूमी जवळ सुभाषने मित्रासोबत आलेल्या अंकुश सोबत वाद घालत त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले. जखमी अंकुशला सोबतचा मित्र अजीज हमीद तडवी याने रुग्णालयात हलविले पण तोपर्यंत अंकुशची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी अंकुशच्या आईच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दोन तासातच आवळल्या संशयिताच्या मुसक्या

सहाय्य्क पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी घटनास्थळाला भेट दिली व तपासाच्या सुचना केल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनायकराव लोकरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी ,आनंद सिंग पाटील रामकृष्ण पाटील, अशोक सगत जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, निलेश पाटील, नितीन पाटील, आसीम तडवी, सचिन पाटील, संदीप पाटील, राजेंद्र कांडेलकर, दीपक चौधरी,भूषण सोनार गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप हजारे रतिलाल पवार करीत आहे.