प्रेमसंबंधांना नकार दिल्याने युगूलाची आत्महत्या

युवकाने साखरपुड्याच्या दिवशी गाठले मृत्यूला : यावल तालुक्यातील घटना

यावल : प्रेमसंबंधांना घरच्यांना विरोध दिल्याने नैराश्यातून हरीपुरा येथील 23 वर्षीय युवक व परसाडे येथील 19 वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. विशेष म्हणजे युवकाचा मंगळवारी साखरपुडा असतानाही त्याने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने यावल तालुक्यात खळबळ उडाली असून या पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलली. शाहरूख बाबु तडवी (23, हरीपुरा, ता.यावल) व मीना शावखा तडवी (19, परसाडे, ता.यावल) अशी मयतांची नावे आहेत.

अन गाठले मृत्यूला
उभयंतांच्या प्रेमंसंबंध असलेतरी त्यास घरच्यांचा विरोध होता शिवाय प्रेमविवाह करण्यासही मंजुरी न मिळाल्याने दोघांनी नैराश्यातून मंगळवारी दोघे आपापल्या घराबाहेर पडले मात्र ते न आढळल्याने सायंकाळी परसाडे गावाजवळ असलेल्या मंगलाबाई गाढे यांच्या शेत बांधावर असलेल्या निांच्या झाडाला दोघांनी गळफास घेतल्याचे उघड झाले. घटनास्थळी पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शदनाखाली पोलिस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, हवालदार असलम खान, दाखल झाले तसेच घटनास्थळी परसाडे ग्रामसेवक मजीत तडवी, वड्री सरपंच अजय भालेराव, पोलिस पाटील महेमुद तडवी, मिलींद भालेराव, हुसेन तडवी आदींनी धाव घेतमृतदेह शवविच्छेदना करीत यावल ग्रमीण रुग्णालयात आणण्यात हलवला. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बारेला यांच्या मार्गदशर्नाखाली डॉ.्रतीक तायडे यांनी शवविच्छेदन केले या घटनेमुळे संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली. यावल पोलिसात पोलिस पाटील महेमुद तडवी यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेने दोन्ही गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.