प्रेमविवाह केलेल्या पत्नीचा स्वयंपाक न केल्याने पतीकडून खून : साक्री तालुक्यातील घटना

आरोपीला पतीला अटक : किरकोळ वादातून घटना

धुळे : स्वयंपाक न केल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने दांड्याने मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील लखाळे (ता.साक्री) येथे मंगळवारी रात्री घडली होती. या घटनेत निर्मला गणेश चव्हाण (35) या विवाहितेचा मृत्यू झाला तर संशयीत आरोपी तथा पती गणेश चव्हाण यास पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या दाम्पत्याचा प्रेमविवाह झाला आहे. आरोपीविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

स्वयंपाक न करणे बेतले जीवावर
ताहराबाद, ता.बागलाण येथील मूळ रहिवासी गणेश एकनाथ चव्हाण याचा निर्मलाचा प्रेम विवाह झाला होता. त्यांना चार मुले असून पत्नीने जेवण बनविले नाही. याचा राग येवून गणेशने निर्मलाशी वाद घातला. त्या वादातून गावातील जिल्हा परीषद शाळेच्या जुन्या इमारतीच्या ओट्यावर निर्मलाला लाकडी दांडक्याने तोंडावर व डोक्यावर मारहाण केल्याने पत्नी निर्मलाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी याबाबत मयताचे वडिल सुरमल मंगळ्या पवार (62, लखाळे) यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने गणेश चव्हाण विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गणेश चव्हाणला अटक केली आहे.

मुले झाली आईच्या प्रेमाला पारखी
मयत निर्मला यांच्या मोठ्या मुलाचे वय 8, दुसर्‍याचे 6 तर तिसरे मुल 4 वर्षांचे आहे. सर्वात लहान मुल पावणेदोन वर्षांचे आहे. गावात राहणारी निर्मलाची बहिण व तिचे वडील यांच्याकडे मुलांना सोपवण्यात आले आहे.