प्रियांका- निकने लग्नातील फोटोंचा हक्क एका मासिकाला १८ कोटींमध्ये विकला

0

मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचा सिजन सुरु आहे. दीपवीरपाठोपाठ आता निक-प्रियांका आणि कपिल शर्माही लवकरच बोहल्यावर चढणार आहेत. लग्नासाठी निक आणि प्रियांका जोधपूरला रवाना झाले असून चाहते त्यांच्या लग्नाविषयीची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सूक आहेत.

मात्र, निक आणि प्रियांकाच्या लग्नातही दीपिका -रणवीर प्रमाणेच मोबाईलवर बंदी असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या लग्नाच्या फोटोसाठी वाट पाहावी लागणार आहे. हा सोहळा पूर्णपणे खासगी ठेवण्यासाठी येणार आहे. एकही फोटो लीक होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. प्रियांकाने आपल्या लग्नातील फोटोंचा हक्क एका मासिकाला १८ कोटींमध्ये विकला असल्याचे सांगितले जात आहे.

Copy