प्रियांका गांधींनी घेतली ‘कॅब’ विरोधी मोर्च्यात मृत तरुणांच्या कुटुंबियांची भेट !

0

बिजनोर: देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात मोर्चे काढण्यात येत आहे. अनेक ठिकाणी याला हिंसक वळण लागले आहे. उत्तर प्रदेशात एका युवकाला मोर्च्यात आपले जीव गमवावे लागले आहे. दरम्यान कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मृत तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली. २०रोजी निघालेल्या मोर्च्यात तरुणाला जीव गमवावे लागले होते.

दरम्यान आज दिल्लीत झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायद्याला होत असलेल्या विरोधावरून विरोधकांना लक्ष केले. कॉंग्रेस आणि काही पक्ष कायद्याविरोधात अफवा पसरवित असून मुस्लीम समुदाय आणि तरुणांची माथी भडकवीत असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. शहरी नक्षलवाद्यांकडून या कायद्याविरोधात अपप्रचार सुरु असल्याचे आरोपही मोदींनी केले.