प्रियंकाच्या हॉट लूकने उपस्थित घायाळ

0

मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा नुकतीच ‘मेल गाला 2017’मध्ये सहभागी झाली होती. प्रियंकाने या वेळेसही हॉट लूकने उपस्थितांना घायाळ करून हॉलीवूड कलाकारांमध्ये स्वतःची जरा हटके पद्धतीने छाप पाडली. प्रियंकाने या कार्यक्रमाच्या वेळी कॉलर कोट परिधान केला होता.

या सोहळ्यात प्रियंकाने रॉल्फ लाऊरेनच्या खाकी रंगातील ट्रेंच कोट परिधान केला होता. या गाऊनसोबत तिने काळ्या रंगाचे बुटही घातले होते. डोळ्यांवर केलेल्या स्मोकी मेकअपमुळे ती आणखीनच मादक दिसत होती. ‘मेट गाला’मध्ये एण्ट्री मिळवणारी प्रियंका चोप्रा ही पहिली बॉलीवूड अभिनेत्री आहे. या सोहळ्याला प्रियंका चोप्राचे हजेरी लावणे यासाठीही विशेष मानले जाते. कारण हॉलीवूडमधील मोजकेच सेलिब्रिटी यात सहभागी होतात.