प्रिकॉशन साठी पी.पी.इ.किट विनाविलंब त्वरित पुरवावेत

0

होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेची मागणी

एरंडोल: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाने खासगी वैद्यकीय डॉक्टरांना व नर्सला प्रिकॉशन साठी पी.पी.इ.किट विनाविलंब त्वरित पुरवावे अशी मागणी होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेने केली आहे.

यासंदर्भात डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश भंगाळे उपाध्यक्ष डॉ. प्रविण वाघ यांनी एका पत्रकाद्वारे मागणी केली आहे. पी.पी.इ. किड्स अभावी फिल्डवर काम करणारे डॉक्टर व नर्सेस संक्रमित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉक्टर कडे येणारा प्रत्येक रुग्ण संशयित कोरोना ग्रस्त आहे.अशी भीती डॉक्टरांच्या वर्तुळात पसरली आहे. तीन ते चार फुटाचे अंतर ठेवून डॉक्टरांनी रुग्ण कसा तपासावा याचे मार्गदर्शन केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने डॉक्टरांना त्वरित मीडियाच्या माध्यमातून करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Copy