प्रा. डॉ. भटकर, निताळे लिखीत पुस्तकाचे प्रकाशन

0

जळगाव । डॉ. सुधीर भटकर व प्रा. विनोद निताळे लिखीत ‘युजीसी सेट-नेट-पेट जनसंज्ञापन आणि पत्रकरिता’ पुस्तकाचे प्रकाशन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. पी. पी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तक प्रकशन सोहळा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कुलगुरु यांच्या दालनात 16 रोजी दुपारी 4.30 वाजता पार पडला. यावेळी बी.सी.यु.डी. चे संचालक प्रा. डॉ. पी.पी. माहुलीकर, प्रशांत पब्लिकेशनचे संचालक रंगराव पाटील, प्रदिप पाटील, डॉ. गोपी सोरडे उपस्थित होते. डॉ. सुधीर भटकर उमविच्या तर प्रा. विनोद निताळे हे मू.जे. महाविद्यालयातील जनसंज्ञापन व वृत्तपत्र विभागात कार्यरत आहेत.

स्पर्धात्मक परिक्षांसाठी उपयुक्त
विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) तर्फे दरवर्षी सेट-नेट परीक्षा आयोजीत केली जाते. ही परीक्षा वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण असलेले विद्यार्थी सेट-नेट परीक्षा देऊ शकतात. सर्वच विषयासाठी ही परीक्षा असून मात्र उत्तीर्ण होण्याची टक्केवारी फार कमी आहे. त्यामुळे जनसंज्ञापन आणि वृत्तविद्या विषयात सेट, नेट च्या पेपर 1 व 2 साठी हे पुस्तक उपयुक्त असून या विषयाच्या विद्यार्थांसाठी ते महत्वपूर्ण आहे. तसेच महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातर्फे घेण्यात येणार्‍या जनसंज्ञापन आणि पत्रकरिता या विषयाच्या पीएच.डी. पदवी पूर्व परीक्षा (पेट) करीता देखील या पुस्तकाची मदत विद्यार्थांना होणार आहे. याशिवाय केंद्रिय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विविध स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.