प्राथमिक शिक्षकांनी मांडल्यास समस्या

0

 खिर्डी : रावेर तालुका प्राथमिक शिक्षक तक्रार निवारण सभा सर्व शिक्षा अभियान कार्यालय रावेर येथे गटविकास अधिकारी नाकाडे यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी धिमते, शिक्षण विस्तार अधिकारी प्रधान, तडवी, केंद्रप्रमुख उपस्थित होते. सभेला दुय्यम सेवा पुस्तक भरणे, गोपनीय अहवाल मिळणे, शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेत होणे, एकस्तर वेतन श्रेणी जानेवारीपासून फरकासह मिळणार, वरीष्ठ वेतन श्रेणी मंजूर झालेल्या शिक्षकांना जानेवारीपासून लागू, शालेय पोषण आहार महिनावार शिल्लक पावती मिळणार अशा प्रमुख मागण्या सभेत मान्य झाल्या.

सदर सभेला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय तायडे, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र बखाल, जिल्हा कोषाध्यक्ष राहूल पाटील, कार्याध्यक्ष गजमल पाटील, विनायक तायडे, हबीब तडवी, दिलीप पाटील, निलेश पाटील, शिक्षकसंघ अध्यक्ष गौस खान जनाब, कैलास घोलाणे आदी कार्यक्रमास हजर होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हरिष बोंडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन भुषण चौधरी यांनी मानले.