प्राथमिक शाळेत शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम

0

नवापूर: नवापूर एज्युकेशन सोसायटी संचालित सार्वजनिक प्राथमिक शाळेत शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष शिरिषभाई शाह, प्रमुख अतिथी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, नगरसेवक अजय पाटील, नगरसेविका मेघा जाधव, हरीशचंद्र पाटील, संदीप पाटील, मुख्याध्यापक महेश पाटील, संजीव पाटील, मिलिंद वाघ, निलेश प्रजापत उपस्थित होते. यावेळी शिरिषभाई शाह यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेचे विद्यार्थी हर्षित मोरे, अंशू सोनवणे, तेजल जगताप यांनी बाल शिवाजी महाराज व मनस्वी पाटील, विषा सोनार, कृपा पाटील, वेदिका चव्हाण, मुद्रा पाटील, दीक्षा पाटील यांनी जिजामाता यांची वेशभूषा धारण करून नृत्य,पोवाडे,गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक महेश पाटील यांनी संचालन योगिता पाटील तर आभार माधुरी चित्ते यांनी मानले.