प्राण्यांवर 1721 हल्ले

0

मुंबई । मुलुंड आणि ठाण्यात बेदरकारपणे वाहन चालवून श्वानांना जिवानिशी मारण्यात आल्याच्या घटना ताज्या असतानाच गेल्या दीड वर्षांत एकूणच भटक्या जनावरांवर नागरिकांकडून होणार्‍या हल्ल्यांच्या घटनांत बेसुमार वाढ झाल्याचे समोर येत आहे. गेल्या दीड वर्षांत अशा हल्ल्यांमध्ये मृत्यू पावलेल्या किंवा अपंगत्व आलेल्या प्राण्यांची संख्या 1721 असल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकरणांतील 600 हून अधिक तक्रारी पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आल्या असल्या तरी आतापर्यंत एकाही आरोपीला शिक्षा झाली नसल्याचा प्राणीप्रेमींचा आरोप आहे.