प्राणघातक हल्ला करणार्‍या सहा संशयितांना अटक

0

जळगाव – तालुक्यातील कुसुंबा येथे गरबा पाहण्यासाठी गेलेल्या तरूणावर चॉपर हल्ला करणार्‍या सहा संशयितांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. कुणाल सुरेश पाटील (वय-29, रा. तुळजाईनगर कुसुंबा), राहुल रामचंद्र बिर्‍हाडे (वय-32, रा. रामेश्वर कॉलनी), गोलू उर्फ दत्तू नारायण चौधरी वय 27, मयुर उर्फ मनोज शालीक चौधरी (वय-27) दोघे रा.दत्त मंदीर, तुकारामवाडी , करण सुदर्शन शिंदे (वय-21, रा. सुप्रिम कॉलनी) आणि सागर यशवंत ओतारी उर्फ अवतारे (वय-21, रा. कुसुंबा ता.जि.जळगाव) अशी संशयितांची नावे आहेत. या सहा संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय घडली घटना
संतोष सुभाष कोळी (वय-21, रा. कुसुंबा ता.जि. जळगाव) हे 25 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास दुचाकीने गावातील
तुळजाईनगरात देवीच्या दर्शनासाठी जात असतांना एका मंडळाजवळ आले. दुचाकी पार्किंग करत असतांना गोलू उर्फ दत्तू नारायण चौधरी (वय-32, रा. तुकाराम वाडी, जळगाव) हा जवळ येवून काहीही कारण नसतांना संतोष कोळी यांच्यावर चाकूने वार केले. यात छातीवर आणि कमरेला वार लागल्याने गंभीर जखमी झाले. झालेल्या झटापटीत आपला स्वत:चा जीव वाचवत संतोष कोळी हे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. मित्र पंकज गणपत योकुळे व संतोष कोळी यांना उपचारासाठी गोदावरी हॉस्पिटलमध्ये जात असता उड्डाणपुलाजवळ पुन्हा सहा जणांना मार केली होती. याप्रकरणी संतोष सुभाष कोळी यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

कर्मचार्‍यांच्या या पथकाने केली अटक
पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक विनायक लोकरे , पोलीस उपनिरिक्षक रामकृष्ण पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सय्यद, सचिन पाटील, किशोर पाटील, सुधी साळवे, योगेश बारी यांच्या पथकाने मध्यरात्री अटक सत्र मोहिम राबवून पाच संशयितांना जळगावातील आदर्शनगरातून अटक केली. व एका संशयितांना बुधवारी सकाळी अटक केली. अटक केलेल्या सहा संशयितांना बुधवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्या. सुवर्णा कुलकर्णी यांनी सर्वाना 2 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे तर्फे अ‍ॅड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप हजारे, रतिलाल पवार करीत आहे.