प्रांताधिकार्‍यांची रावेर कोविड सेंटरला भेट : जेवण, स्वच्छता, सुविधांची केली पाहणी

0

रावेर : प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी रविवारी रावेर कोविड सेंटरला भेट देऊन जेवण, स्वच्छता व इतर सोयी-सुविधांची पाहणी केली तसेच कॉरंटाईन असलेल्या नागरीकांचीदेखील त्यांनी संवाद साधला. रावेर तालुक्यात गत आठ-दहा दिवसात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला असून या दरम्यान तब्बल आठ जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभुमीवर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले रविवारी रावेर भागात आले. त्यांनी कोविड सेंटरला भेट दिली व त्यानंतर रावेर तहसीलला जाऊन आरोग्य, नगरपालिका, प्रशासनाला खबरदारी म्हणून योग्य त्या सूचना दिल्या आहे. यावेळी त्यांच्या सोबत तहसीलदार उषाराणी देवगुणे, मुख्याधिकारी रवींद्र लांडे आदी उपस्थित होते. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी सर्व विभागांना योग्य त्या सूचना करणार असून नागरीकांनादेखील त्यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Copy