रतनलाल बाफना यांच्यावर अंत्यसंस्कार

0

जळगाव – प्रसिध्द सुवर्ण व्यवसायिक रतनलाल सी बाफना यांच्यावर सोमवारी संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ बाफना व राजकुमार बाफना यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.

यावेळी बाफना कुटुंबियासह उद्योजक अशोकभाऊ जैन, माजी मंत्री गिरिष महाजन, माजी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, खा. ईश्वरलाल जैन, आ. सुरेश भोळे, माजी खा.डॉ. उल्हास पाटील, गोसेवक अजय ललवाणी, माजी महापौर रमेश जैन, भरतदादा अमळकर, कवरलाल संघवी, माजी आ.मनिष जैन, स्वरुप लुंकड, भागवत भंगाळे, मल्हार कम्युनिकेशनचे आनंद मल्हारा, दीपस्तंभचे यजुर्वेद महाजन यांच्यासह समाजातील व्यापारी, उद्योजक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Copy