प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे करणार राष्ट्रवादी प्रवेश !

0

पुणे: मराठी कलाविश्वातील दिवंगत लोकप्रिय अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. येत्या ७ जुलै रोजी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रिया बेर्डे पक्ष प्रवेश करणार आहेत. चित्रपटसृष्टीमध्ये पडद्यामागे राहून काम करणाऱ्या लोकांसाठी काही तरी करता यावे, यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

प्रिया बेर्डे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त होणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या प्रिया बेर्डे या पुण्यातच लक्ष्मीकांत बेर्डे फाऊंडेशनचा कारभार चालवत आहेत. त्यामुळे पुण्यामधूनच नवीन काम करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ७ जुलै रोजी अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतलाताई नगरकर, अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, अभिनेते विनोद खेडेकर, लेखक दिग्दर्शक डॉक्टर सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे हेदेखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे म्हटलं जात आहे.

Copy