प्रशासनाचे अंदाजपत्रक स्थायी समितीच्या चर्चेत

0

जळगाव । महानगरपालिकेचे सन 2017-2018 साठी करवाढ नसलेले 593 कोटी 95 लाख रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त जीवन सोनवणे यांनी विशेष स्थायी समिती सभेत सादर केले होते. अभ्यास करण्यासाठी ही सभा तहकुब करण्यात आली होती. ही सभा सोमवारी 20 मार्च रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. या सभेत सभापती सुधारीत अंदाजपत्रक मांडणार आहेत. स्थायी समितीची अर्थसंकल्पीय विशेष सभा 20 फेब्रुवारी रोजी सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. यावेळी आयुक्त जीवन सोनवणे यांनी सन 2017-18 साठी 593 कोटी 95 लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले. यात अंदाजपत्रकात शासकीय योजना व अनुदानाचा समावेश करण्याच आल्याचे आयुक्तांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले होते.

करवाढ नसलेले अंदाजपत्रक
अंदाजपत्रकात कुठलीही करवाढ करण्यात आलेली नाही. महानगर पालिकेची आर्थिक परिस्थिती कर्जफेडीमुळे बिकट बनल्याने नागरिकांना चांगल्या सुविधा देता येत नसल्याने करावाढ करणे योग्य होणार नाही असे आयुक्त सोनवणे यांनी स्पष्ट केले. करवाढ करण्यात आली नसली तरी करआकारणीतील तफावत दूर करण्यासाची प्रकीया सुरु राहणार आहे. तसेच जीपीएसच्या साह्याने मालमत्ताचे सर्व्हेक्षण करणार आहे. त्यामुळे नवीन मालत्ता सापडून कराच्या उत्पन्न वाढ होण्याची अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली होती. प्रशासनाने सादर केलेल्या अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी सभपती वर्षा खडके यांच्या सूचनेनतंर सभा तहकूब करण्यात आली होती. ही तहकुब सभा सोमवारी होत आहे. सभेत अंदाजपत्रकावर चर्चा देखील होणार आहे. तसेच अंदाजपत्रकातील तरतुदींमध्ये सभापती व सभागृहाच्या चर्चेनतंर सुधारणा करुन त्यास मान्यता देण्यात येणार आहे.