प्रशासनाकडून त्यांची भूक भागवण्यासाठी व्यवस्था नाही

0

मुसाफ़िर हू यारो ना घर हैं ना ठिकाणा……

अमळनेर (सचिन चव्हाण):

आज कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करतेय. त्यासाठी एकवीस दिवसाचा संचारबंदी चा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र असे होत असताना जे काही लोक आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेरून आलेले आहेत ज्यांना घर नाही दार नाही जे रोज कमवतील रोज खातील असा जीवनप्रवास करून आपले आयुष्य घालवताहेत त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे मात्र प्रशासनाकडून त्यांना भूक भागवण्यासाठी कुठल्याही प्रकारची जेवणाची व्यवस्था केली गेली नाही ही शोकांतिका आहे. 

अमळनेरमध्ये खूप कोतुकास्पद बाब आहे की काही सामाजिक कार्यकर्ते यावेळी पुढे येऊन मदतीचा हात देत आहेत. बऱ्यापैकी लोक शासनाच्या संचारबंदी या निर्णयाला चांगला प्रतिसाद देत आहेत. मात्र काही याला अपवाद देखील आहेत.

Copy