प्रशांत भुषण यांच्यावर कारवाई करा

0

भुसावळ। प्रशांत भुषण यांनी भगवान श्रीकृष्ण यांचा अवमान करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात समितीतर्फे प्रांंताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना निवेदन देण्यात आले आहे. यात नमूद करण्यात आले आहे की, भुषण यांचा पुर्वइतिहास लक्षात घेता त्यांना वादग्रस्त विधाने करण्याची सवय आहे. यापुर्वी त्यांनी काश्मिरविषयी असेच संतापजनक विधान केले होते. त्यामुळे त्यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करण्यात येण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन देतांना यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख उमाकांंत शर्मा, उमेश जोशी, जीवन पाटील, अक्षय जोशी, निखिल चौधरी, भुषण महाजन, प्रशांतसिंग ठाकुर, हितेश टकले, अभिजित मराठे, शुभम पचरवाल, सुमित झांबरे, कृष्णा साळी, दिपक मंडवाले, प्रणय अहिरे, पियुष महाजन, किसन पचेरवाल, दिनेश दोधानी आदी उपस्थित होते.