प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वेच्या अतिरीक्त गाड्या

भुसावळ : उन्हाळ्याच्या काळात रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात येत असून रेल्वे सेवांना हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा एक भाग आहे. रेल्वे प्रशासन सर्वांना आवाहन करीत आहे की, कोविड 19 च्या अशा आव्हानात्मक परीस्थितीत रेल्वेच्या अतिरिक्त सेवांच्या विशेष कारणांबद्दल आणि बुकिंगच्या संदर्भात पॅनिक बुकींग असा तर्क काढणे टाळावे, असे आवाहन प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने केले आहे. गैरसोय टाळण्यासाठी केवळ कंफर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये प्रवासाची परवानगी दिली आहे. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.