प्रवाशांचा अल्प प्रतिसाद : भुसावळात बससेवेला ‘ब्रेक’

1

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एस.टी.सेवेला ब्रेक लागला होता मात्र शासनाच्या निर्देशानुसार सुमारे महिनाभरानंतर अर्थात एप्रिलपासून जिल्हांतर्गत बस सेवेला सुरुवात करण्यात आली होती मात्र शहरासह तालुक्यात दिवसागणिक वाढणारा कोरोनाचा फैलाव पाहता प्रवाशांनी एस.टी.प्रवास टाळून घरीच राहणे पसंत केल्याने ग्रामीण भागात होत असलेल्या फेर्‍यांचा खर्चदेखील निघणे दुरापास्त ठरत होत असल्याने भुसावळ आगाराने 1 जूनपासून बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरूवातीला वरणगाव फॅक्टरी, बोदवड आणि रावेरसाठी बस सुरू झाली मात्र प्रवाशांचा अल्प प्रतिसादाअभावी बोदवड व नंतर वरणगाव फॅक्टरीची सेवा बंद करण्यात आली तर रावेरसाठीदेखील अपेक्षित प्रतिसाद नसल्याने येथेदेखील बसची फेरी रद्द करण्यात आली. बसस्थानकात प्रवासी येत नसल्याने शुकशुकाट असल्याचे चित्र आहे. जोपर्यंत प्रवासी येत नाही, तोपर्यत बस सेवा सुरू होणार नाही, असे सांगण्यात आले.

माल वाहतूक मात्र सुरू
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एस.टी.प्रवास प्रवाशांनी टाळला असलातरी एस.टी.ने मात्र आता माल वाहतूक सेवा सुरू केली असून त्यास प्रतिसाद लाभत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Copy