प्रलंबीत सर्व कामे मार्च 2017 पर्यत मार्गी लावा

0

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद अध्यक्ष प्रयाग कोळी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेतील साने गुरुजी सभागृहात जलव्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांण्डेय यांनी प्रलंबीत असलेले विकासकामातील अडचणींचा शोध घेऊन हे कामे मार्च 2017 पर्यत त्वरीत मार्गी लावा असे स्पष्ट आदेश अधिकार्‍यांना दिले. सभेच्या सुरुवातीला दहशतवादी हल्लात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहिन्यात आली. तद्नंतर नवनिर्वाचित विधानपरिषदेचे आमदार चंदुलाल पटेल यांचे अभिनंदन करण्यात आले. दरम्यान ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला.

सदस्यांनी ग्रा.पा.पु. कामात होत असलेल्या दिरंगाई बद्दल नाराजी व्यक्त केली. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाची ग्रामपंचाय स्तरावर दिलेले लक्षांक बाबत यावेळी चर्चा करण्यात येऊन शबरी योजनेचा आढावा देखील घेण्यात आला. यावेळी जि.प. उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले, समाज कल्याण सभापती दर्शना घोडेस्वार, शिक्षण सभापती सुरेश धनके, जि.प.सदस्य निता चव्हाण, रुपाली चोपडे, मिना पाटील, रमेश पाटील आदी सह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, कार्यकारी अभियंता नाईक आदी अधिकारी उपस्थित होते.

तीन कोटीच्या कामांना मंजुरी
यावल, चोपडा, रावेर, चाळीसगांव, या तालुक्यातील आदिवासी भागातील सावठवण बंधारा बांधणे, साठवण बंधारा नाला खोलीकरण, पाझर तलाव दुरुस्ती, इत्यादी कामांसाठी 2 कोटी 90 लाख निधीच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. जलव्यवस्थापन समितीच्या सभेत ही मंजुर कामे अवलोकनार्थ सादर करण्यात आले. सभेत यांवर चर्चा करण्यात आले.