प्रभाग एकमध्ये मुलभूत सुविधा मिळेना

0

वरणगाव। सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक जागृती बढे यांच्या प्रभागात मंजुर कामे होत नाही. पाण्याचा व स्वच्छतेच्या प्रश्नामुळे त्रस्त झालेल्या नगरसेविका व नागरीक थेट पालिकेत धडकत संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन सुरु केले. यावेळी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष नसल्याने त्यांची समजुत पाणीपुरवठा सभापती बबलु माळी, नगरसेवक सुधाकर जावळे व विरोधी पक्षनेते राजेंद्र चौधरी यांनी काढली.

तीन महिन्यांपासून जलवाहिनीला गळती
प्रभाग क्रमांंक 1 मधील नगरसेवीका जागृती बढे याच्या प्रभागात मंजुर कामे सुरूवात करण्यात आली नाही. त्यामुळे पालिका सभेत त्यांनी नाराजी व्यक्त करत सभात्याग केला होता. तसेच शहरातील विविध विकास कामांचे भुमीपूजन माजी मंत्री एकनाथराव खडसे तथा माजी पालकमंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. या कार्यक्रमावर देखील त्यांनी बहिष्कार टाकत या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असताना देखील दुजाभावाची वागणुक मिळत असल्याने त्या नाराज आहेत. प्रभागात गेल्या 3 महिन्यांपासून जलवाहनीला गळती लागली आहे. मात्र कर्मचार्‍यांना सांगुन देखील लिकेजचे काम केले नाही. यामुळे पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर काही घरांना पाणीपुवठा होत नाही. पाणी व इतर सुविधांसाठी नागरीक थेट पालीकेत धडकले. या ठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू कले. मात्र नगराध्यक्ष अरूणा इंगळे महत्वाच्या कामानिमित्त बाहेर तर मुख्याधिकारी प्रशांत सरोदे चोपडा येथे असल्याने पाणीपुरवठा सभापती बबलु माळी व नगरसेवक सुधाकर जावळे यांनी पालीकेत धाव घेतली. त्यांनी नागरीकांची व नगरसेवीका जागृती बढे यांना समजावून सांगीतले. यानंतर सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी विरोधी पक्षाचे गटनेते राजेंद्र चौधरी, नगरसेवक गणेश धनगर, पालीकेचे गंभीर कोळी, राजु गायवाड, संजय माळी आदि उपस्थित होते.