प्रदर्शनापूर्वीच २.०ने मोडला बाहुबलीचा रेकॉर्ड

0

मुंबई : दाक्षिण असो किव्वा हिंदी सिनेमासृष्टी सगळ्यांचा सुपरस्टार म्हणजे रजनीकांत घेऊन येत आहे २.०. या चित्रपट व्हिलनची भूमिका साकारताना बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार दिसणार आहे. हा चित्रपट २९ नोव्हेंबरला रिलीझ होणार असून बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यास सज्ज झाला आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबतची उत्सुकता आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनेही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. अनेक रेकॉर्ड्स या ट्रेलरने मोडले. आता प्रदर्शनापूर्वीच ‘बाहुबली’ या सुपरडुपरहिट चित्रपटालाही २.० टक्कर देताना दिसत आहे.

रजनीकांत आणि अक्षय कुमार एकत्र या चित्रपटात टक्कर देताना दिसणार आहेत. हा चित्रपट तमिळ, तेलुगु, आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे एकुण बजेट हे जवळपास ५०० कोटी. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने १०० कोटींची कमाई केली आहे.

या चित्रपटाने स्क्रिन्सच्या बाबतीत बाहुबली चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. हा चित्रपट तब्बल ६६०० ते ६८०० स्क्रिन्सवर झळकणार आहे. बाहुबली-२ हा चित्रपट जवळपास ६५०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला होता.

Copy