प्रत्येक घरामधुन देशसेवेसाठी एक जवान आवश्यक

0

निंभोरा : देश सेवा हिच ईश्वर सेवा असून प्रत्येक घरामधून देशसेवेसाठी एक जवान आवश्यक असून तरुणांनी सैन्यदलात भरती होण्याचे आवाहन निंभोरा येथील 1971 युध्दातील माजी सैनिक सुधाकर धनगर यांनी केले. येथून जवळच असलेल्या ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीरास जिल्हा परिषद मराठी शाळा धामोडी येथे 22 ते 28 डिसेंबर दरम्यान सुरुवात करण्यात आली आहे. या शिबीराचे उद्घाटन 22 रोजी माजी सैनिक सुधाकर गंजी सोनवणे यांच्या हस्ते झाले.

स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ऐनपूर प.शि. मंडळाचे सचिव संजय पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन धामोडी सरपंच तरुणा पाटील, पोलीस पाटील दत्तात्रय पाटील, ऐ.प.शि मंडळाचे प्रकाश चौधरी, रामदास पाटिल, वासुदेव पाटिल, निंभोरा पोलीस स्टेशनचे एपीआय गणेश कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी. अंजणे हे होते. तसेच दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना निंभोरा एपीआय गणेश कदम यांनी स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन केले. यावेळी प्रास्ताविक प्रा.डॉ. सतीष वैष्णव यांनी तर सुत्रसंचलन प्रा. जयंत नेहेते व आभार प्रा.डॉ. निता वाणी यांनी मानले.