प्रत्येकाने आधारकार्ड, बँक खाते उघडून जयंती साजरी करा

0

भुसावळ । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आदर्श भारताचे स्वप्न पाहिले होते. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानिक मार्गाने देशाला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी सर्वांनी आपले आधार कार्ड व बँक खाते उघडून आगळ्या – वेगळ्या प्रकारे जयंती साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी केले. येथील रेल्वेच्या रंगभवन सभागृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

मंचावर यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मंचावर जिल्हा पोलीस अधिक्षक जालिंदर सुपेकर, नगराध्यक्ष रमण भोळे, अप्पर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, डिवायएसपी निलोत्पल, प्रांताधिकारी निलोत्पल, तहसिलदार मिनाक्षी राठोड, प्रभारी पोलीस निरीक्षक मनीष कलवानिया, मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर आदी उपस्थित होते.

मिरवणुकीदरम्यान शिस्तीचे दर्शन घडवा
जयंती साजरी करताना वेळेचे भान राखण्याची आवश्यकता असून मिरवणूका लवकर सुरु करुन रात्री लवकर 12 वाजेच्या आत संपवा, पोलीस प्रशासन हे आपल्या सुरक्षेसाठीच कार्यरत असून पोलीसांना सहकार्य करा, शिस्तीचे दर्शन घडवून जयंती साजरी करा असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक जालिंदर सुपेकर यांनी केले. तसेच मिरवणूकीदरम्यान अपघात टाळण्यासाठी अवजड वाहनांची तपासणी करुन घेण्याच्या सुचना देखील त्यांनी पदाधिकार्‍यांना केल्या.

जातीय सलोखा राखा
मिरवणूकीदम्यान अनुचित प्रकार न होता. याावर्षीच्या जयंतीला सर्वांनी आदर्श व्यसनमुक्त जयंती साजरी करण्याचे आवाहन आरपीआयचे राजु सुर्यवंशी यांनी केले. तर जातीय तेढ निर्माण होईल असे संदेश न पसरविता सलोख्याने दर्शन घडविण्याचे आवाहन पीआरपी जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी केले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक उल्हास पगारे, रविंद्र खरात, प्रा. दिनेश राठी, मुकेश गुंजाळ, राजु खरारे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रकाश लोडते यांनी केले. तर आभार पोलीस निरीक्षक सरोदे यांनी मानले.