प्रतिकूल परिस्थितीस तोंड देण्याकरिता मुलींनी कणखर बनावे

0

भडगाव । जवळच असलेल्या उत्राण येथे कन्या शिक्षण हक्क जागर कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. जीवनात ध्येय गाठायचे असेल तर मूलींनी अथक परिश्रम केले पाहीजेत तसेच प्रतिकुल परिस्थीतीस तोंड देण्याकरिता कणखर बनलं पाहीजे, असे प्रतिपादन डायट अधिव्याख्यात्या प्रतिभा भावसार यांनी ’कन्या शिक्षण हक्क जागर’ या कार्यक्रमात उत्राण येथे केले. अध्यक्षस्थानी जे.एस.जाजू हायस्कुलचे दिलीप संघवी होते तर उदघाटक म्हणून भिला महाजन होते. उत्राण गु.ह. गावाचे सरपंच अनिल महाजन, अ.ह.च्या सरपंच कौशलताई अहीरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते. गटशिक्षणाधिकारी एन.एफ.चौधरी व शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास पाटील आदी उपस्थित होते.

न डगमगता मुलींनी शिक्षण घ्यावे
डॉ संगिता महाजन यांचा एमपीएससी परिक्षेतून डायट मध्ये निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. संकटांची मालिका असतांनाही मूलींनी न डगमगता शिक्षण घेत राहीलं पाहीजे याकरिता ध्येय व चिकाटी आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या स्वानुभवांद्वारे पटवून दिले. सुत्रसंचालन वैभव महाजन यांनी तर आभार दिपक महाजन यांनी मानले. यशस्वीतेकरीता स्वप्नील पाटील, उत्राण, भातखंडे व तळई येथील विद्यालयातील कर्मचार्‍यांनी कामकाज पाहिले. आयोजन जे.एस.जाजू हायस्कुलचे उपशिक्षक भरत शिरसाठ यांनी केले होते. मुख्याध्यापक बी.के.पंचोली, एम आर बावस्कर, जी.जे.पाटील मुख्यध्यापक भातखंडे आदी उपस्थित होते.