प्रताप विद्या मंदिराच्या शताब्दी वर्षानिमित्त रंगभरण स्पर्धा

0

चोपडा । येथील चोपडे एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराच्या शताब्दी वर्षानिमित्त रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेच्या सचिव माधुरी मयूर यांच्याहस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी बेटी बचाव, बेटी पढाव आणि वृक्षारोपण’ या विषयावर रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. स्वतः माधुरी मयूर व ललित कला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी रंगभरण स्पर्धेचे सुरुवात केली.

सचिवांनी केले रंगभरण
चोपडा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव तसेच शाळेच्या माजी विद्यार्थी माधुरी मयूर यांनी स्पर्धकांना प्रोत्साहित करतांना मंचावर स्वतः देखील रंगभरण केले. या स्पर्धेत तालुक्यातील 65 शाळांच्या पंधराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी चित्रकला शिक्षक ए.पी. पाटील, दिनेश बाविस्कर, राकेश विसपुते, प्रा. विनोद पाटील, योगेश मयूर यांचेसह शहरातील प्रमुख विद्यालयांचे कला शिक्षक उपस्थित होते.तसेच प्रताप विद्या मंदिराच्या मुख्यध्यापिका अरुणा पाटील,उपमुख्याध्यापक आर.बी. देशमुख, डी.व्ही. याज्ञिक, डी.एस.पांडव, ए.टी.पाटील, गोविंद गुजराथी, ए.ए.ढबू, डी.के.महाजन उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वीतेसाठी पंकज नागपुरे, कमलेश गायकवाड, प्रदीप कोळी यांनी परीश्रम घेतले.