प्रणव मुखर्जींच्या निधनाची अफवा; स्थिती मात्र चिंताजनकच

0

नवी दिल्ली: भारतरत्न पुरस्काराचे मानकरी देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे नेते प्रणव मुखर्जी यांच्यावर मेंदूशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यातच ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याने प्रकृती अधिक नाजूक झाली आहे. मात्र त्यातच त्यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियात पसरविण्यात आली आहे. परंतु प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजित मुखर्जी आणि मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांच्या निधनाच्या अफवेवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे.

पुत्र अभिजित मुखर्जी आणि कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्वीट केले आहे. सध्या मी रुग्णलयातच असून तेथील कामकामाजासाठी मला माझा फोन फ्री ठेवायचा आहे. त्यामुळे, कृपया मला कुणीही फोन करु नये, असे शर्मिष्ठा यांनी म्हटले आहे. तर अभिजित मुखर्जी यांनी माझ्या वडिलांची प्रकृती नाजूक असून ते अद्याप जिवंत आहेत, त्यांच्या निधनाची अफवा पसरवू नका असे आवाहन केले आहे.

प्रणव मुखर्जीं यांच्या मेंदूवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यादरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना दिल्लीतील रुग्णालयात व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते.

Copy