Private Advt

प्रजास्ताकदिनी जामनेर पोलिस स्टेशनच्या नुतन वास्तूचे पालकमत्र्यानच्या हस्ते उद्घाटन

जामनेर – प्रजास्ताकदिनी जामनेर पोलिस स्टेशनच्या नुतन वास्तूचे उद्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. अनेक दिवसांपासून जामनेर पोलिस स्टेशनची नुतन वास्तू उद्घाटनाच्या प्रतिक्षेत होती. मात्र प्रजासत्ताक दिनी या वास्तूच्या उद्घाटनाचा मुहुर्त साधला जात आहे.
कार्यक्रमात पालकमंत्र्यांसह जामनेर तालुक्याचे आमदार गिरिश महाजन, स्थानिक पदाधिकारी तसेच पोलिस प्रशासनातील पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलिस अधिक्षक (चाळीसगाव) रमेश चोपडे, पोलिस उप अधिक्षक भारत काकडे (पाचोरा उप विभाग), पोलिस निरिक्षक (जामनेर) किरण शिंदे तसेच स्थानिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. कोरोनाचे नियम पाळून अतिशय कमीतकमी उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्याचे नियोजन असून लवकरच काही दिवसात नव्या वास्तूमधून पोलिस स्टेशनचा कारभार सुरु होणार आहे