‘प्यार का पंचनामा ३’साठी नुसरत भरुचा उत्सुक

0

मुंबई : ‘प्यार का पंचनामा’ फ्रेन्चाईजीमधून अभिनेत्री नुसरत भरुचाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर तिच्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली.

नुसरत लवकरच ‘प्यार का पंचनामा ३’ मध्ये झळकणार आहे. या चित्रपटाबद्दल तिला उत्सुकता लागली आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली, ‘प्यार का पंचनामा ३’बद्दल मी प्रचंड उत्सूक आहे. कारण या फ्रेन्चाईजीच्या तिसऱ्या भागाची कथा मुलींच्या दृष्टिकोनातून लिहिली गेली आहे. अखेर मी बदला घेणार आहे, असे तिने सांगितले.