पोवाड्यातून शिव जागर

0

जळगाव । ग र्जा महाराष्ट्र माझा , मला फक्त जिजाऊचा शिवा पाहिजे , स्वराज्य निर्माता पुन्हा जन्माला या असे विविध पोवाड्यांनी प्रिप्राळा येथील सोमाणी मार्केट परिसरात शिवजयंती महोत्सवा निमीत्ताने जाहीर पोवाड्याचे आयोजन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती करण्यात आले होते . छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज, आई जिजाऊंना आभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शाहीर सुरेश जाधव औरंगाबादकर यांनी पोवाड्यांचे गायन केले. त्यांच्या दमदार आवाजाने रसीकांमध्ये वीरश्री संचारल्याचे दिसत होते. यावेळी रसिकांनी शिवाजी महाराज की जय घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता . पोवडा ऐकण्यासाठी अबालवृद्धांनी गर्दी केली होती.
चिमुरड्या बाल शिव शाहिराने वेधले लक्ष
एका 14 वर्षीय शाहीराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या आधारावर पोवाडा साजरा केला. पोवाडे सादर करणार्‍या शाहीर सुरेश जाधव व त्याचे साथीदार जगनाथ पाखरे , शरद खाडिलकर यशवंत सूरज जाधव, आकाश जाधव प्रशांत जाधव यांचा जाहीर सत्कार या वेळी करण्यात आला . आपल्या विशेष दमडी या वाद्यांच्या आधारावर संपूर्ण शिचरित्र नागरिकांना शाहीर जाधव यांनी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. आयोजकांनी 19 फेब्रुवारीला छत्रपती शवाजी महाराजांच्या मिरवणुकीत माठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन केले आहे .
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नगरसेवक आबा कापसे , नगरसेवक संदेश भोईटे ,अजिक्य देसाई ,उद्योगपती साजिद शेख , रामानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण वाडीले अजित पाटील , पुरोषोत्तम चौधरी . शिवराम पाटील ,मुकूंद सपकाळे, राम पवार समीर जाधव , ए बी निकम,विकास पाटील ,विकास नरवाडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अरविंद पाटील यांनी केले.