पोलीस स्थापना दिनानिमित शस्त्र प्रदर्शन

0

जळगाव : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस (२ जानेवारी) निमित्त जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे २ जानेवारी ते ८ जानेवारी या संपूर्ण आठवडा भरात जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त काव्य रत्नावली चौकात जळगाव पोलीस दलातर्फे शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, पोलीस उपअधीक्षक (गृह) महारु पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रदर्शनात एके ४७ रायफल, एस.एल.आर. रायफल, इन्सास रायफल, कार्बाईन रायफल, शॉट वेपन,  पोईट  २-२ पंप अक्शन, गेस गन, अश्रू धूर, जमाव नियंत्रणाचे साहित्य, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे साहित्य,वायरलेस विभागाची माहिती आदी सर्वांची माहिती मांडण्यात आली आहे.या कार्यक्रमासाठी राखीव पोलीस निरीक्षक शालीक उईके, युवा शक्ती फाऊंडेशन, भवरलाल जैन मल्टिपर्पज फाऊंडेशन यांचे सहकार्य  लाभले. यावेळी शहरातील आर.आर.विद्यालय, रायसोनी इंग्लिश मिडीयम  स्कूल, सेन्ट  जोसेफ, पुष्पावती गुळवे विद्यालय, या. दे. पाटील विद्यालय,ओरीयन इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळांचे विद्यार्थ्यांनी ही माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस नाईक विनोद अहिरे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी पो.हे.कॉ. रावसाहेब गायकवाड व पो.ना.सतीश देसले यांनी परीश्रम घेतले.