पोलीस मित्र अनिल वर्मा यांचा सत्कार

0

जळगाव : पोलीस दलास, पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यासाठी अनेक वर्षापासून मदतनीस म्हणून सदैव तत्पर राहणारे अनिल वर्मा यांचा तत्कालीन अपर पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. अनिल वर्मा हे पोलिसांना रेल्वे प्रवासासंदर्भात माहिती सांगत असतात. तर वर्मा हे प्रवासासंदर्भात पोलीसांना येणार्‍या अडचणींना सोडवून त्यांना प्रवासाची माहिती देत त्यांना प्रवास तिकीट उपलब्ध करून देतात.

पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना अचानक तपासासाठी गावोगावी फिरावे लागते. त्यासाठी वर्मा हे नेहमीच रिझर्व्हेशन करुन त्यांच्या अडचणी सोडवून देतात. अनिल वर्मा हे पोलीस दलाच्या व्यतिरिक्त महसूल विभाग व इतर शासकीय विभाग यांना सुद्धा रेल्वेच्या प्रवासासंदर्भात गाड्याची अचूक माहिती देवून रिझर्व्हेशन संदर्भात मदत करीत असतात. अनिल वमाजी हे आरक्षणाचे तिकीटे काढून ते पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना थेट आणून देतात. त्यामुळे अधिकारी व पोलीसाचा बराचसा वेळ वाचतो. त्यामुळे त्यांचा कौतुकास्पद कार्यामुळे तत्कालीन अपर पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी त्यांचा गौरव केला होता. तसेच गुलाबपुष्प देवून सत्कार देखील केला .